बारामती लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार सौ. सुनेत्राताई अजितदादा पवार यांना जाहीर पाठिंबा

आज ८.०४.२०२४ रोजी पतित पावन संघटना खडकवासला विभागाच्या वतीने, बारामती लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार सौ. सुनेत्राताई अजितदादा पवार यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी भव्य मेळावा आयोजित करण्यात आला.राष्ट्रवादी पक्षाचे पुणे जिल्हाअध्यक्ष श्री. प्रदीप दादा गारटकर यांच्याकडे जाहिर पाठिंब्याचे पत्र दिले. या वेळी प्रदेश सरचिटणीस श्री नितीन सोनटक्के साहेब, संपर्क प्रमुख राजेश मोटे,शिवसेना जिल्हा प्रमुख बापु कोंडे,पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, पुणे शहर पालक मनोज नायर, पुणे शहर कार्याध्यक्ष गोकुळ शेलार, उपाध्यक्ष पप्पु टेमघरे, जिल्हा अध्यक्ष सुनील मराठे, जिल्हा कार्याध्यक्ष माऊली साठे, शहर संघटक विजय गावडे,सह संघटक शरद देशमुख , चिटणीस राजाभाऊ बर्गे, हराळे पाटील, शंकर बरके,कोथरूड विभाग प्रमुख अण्णा बांगर,कसबा विभाग प्रमुख प्रशांत कुरुमकर, शिवाजी नगर विभाग प्रमुख आदित्य बर्गे, संघटक सागर धिवार, वाहतूक विभाग प्रमुख अनिकेत बांदल आदी अनेक जण उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन खडकवासला विभाग अध्यक्ष तेजस पाबळे व विभाग प्रमुख सौरभ कुलकर्णी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *